1950 पासून जे स्वप्न बघितले ते आत्ता पूर्ण होत आहे – मुख्यमंत्री

1950 पासून जे स्वप्न बघितले ते आत्ता पूर्ण होत आहे – मुख्यमंत्री

मुंबई – भाजप प्रदेश कार्यकारणीच्या कार्यक्रमाचा आज समारोप झाला.मुंबईतील वांद्रे येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. कार्यक्रमाचं समारोपीय भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून यावेळी 1950 पासून जे स्वप्न बघितले ते आत्ता पूर्ण होत आहे, शौचालय सर्वांना उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आरोग्यसेवा,  आयुष्यमान योजना आपण उपलब्ध करून दिली.  50 कोटी लोकांना उपचार सुविधा आता देशांत मिळणार आहेत. कारण महागडी आरोग्यसेवा ही आजपर्यंत गरिबांपासून दूर होती असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान मी विरोधकांना आव्हान करतो की तुमची 15 वर्षे घेऊन एका मंचावर या, माझी 4 वर्षांची कामे मी घेऊन येतो, इच्छाशक्ती असेल तरच कामे होतात. 70 वर्षात जेवढे महामार्ग राज्यात झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त महामार्गाची कामे आज मार्गी लागत आहेत.गडकरी, चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास खाते असलेल्या पंकजा मुंडे यांच्यामुळे राज्यात आता 50 हजार किमीच्या रस्त्यांच्या बांधणीचा विक्रम आपण करत असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तसेच आपण जेव्हा सत्तेत आलो तेव्हा सिंचनबाबत राज्यात भयानक अवस्था होती. अनेक ठिकाणी प्रशासकीय मान्यता न देता – टेंडर न काढता, भूसंपादन न करता कामे सुरू केली होती, असे अनेक घोटाळे केले असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. परंतु आपण या सर्व व्यवहारात पारदर्शकता आणली. सिंचनावर 30 हजार कोटी खर्च केले आणि आणखी 30 हजार कोटींचे प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून सुरू होत आहेत. आपण गेल्या साडेतीन वर्षात 13 लाख हेक्टरने सिंचन क्षमता वाढवली असल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

COMMENTS