कोकणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला भाजपाचा पाठिंबा ?

कोकणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला भाजपाचा पाठिंबा ?

रत्नागिरी – कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील  विधान परिषद निवडणुकीला वेगळं वळण लागलं असून या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला भाजपनं पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपनं ही खेळी खेळली असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत भाजपच्या सर्व सदस्यांना वरुन आदेश दिले असून शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं ही खेळी खेळली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेनेकडून रायगडचे राजीव साबळे आणि राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक दोन्ही बाजूकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि स्वाभिमानच्या आघाडीला आता भाजपनंही पाठिंबा दर्शवला आहे. या निवडणुकीसाठी सेना-भाजपची युती झाल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळेस भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दर्शवल्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS