भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा – संजय राऊत

भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा – संजय राऊत

मुंबई – भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याबाबतचा दावा राऊत यांनी  केला असून राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह घेणार आहेत. परंतु सध्या पंतप्रधान मोदी हे विदेश दौ-यावर असल्यामुळे याबाबतचा निर्णय रखडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात मराठा आंदोलन सुरु असल्यामुळे राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे. तसेच या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलं असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान काल महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज मुंबईमध्ये बंद पाळण्यात येत आहेत. याचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटले असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS