भाजपच्या तिसय्रा यादीतही ‘या’ नेत्यांना स्थान नाही!

भाजपच्या तिसय्रा यादीतही ‘या’ नेत्यांना स्थान नाही!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिसरी यादी जाहीर केली आहे. परंतु या तिसय्रा यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे या दिग्गज नेत्यांची नावे नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या तिसय्रा यादीत चार नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान कालच भाजपनं 14 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या दुसऱ्या यादीतही विनोद तावडे, एकनाथ खडसे, बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तिसय्रा यादीत या नेत्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. परंतु तिसय्रा यादीतही या नेत्यांचं नाव नाही. तसेच खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनाही तिसय्रा यादीत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्यांनाही या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.

COMMENTS