विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे, खडसेंना संधी नाही, नव्या नेत्यांना तिकीट!

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे, खडसेंना संधी नाही, नव्या नेत्यांना तिकीट!

मुंबई – विधान परिषदेसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षातले ज्येष्ठ नेते आणि इच्छुक एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली नसून गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.

या उमेदवारीनंतर भाजपात आता पुन्हा अंतर्गत धुसफूस पुढे येण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
माझी इच्छा होती. मी विनंतीही केली होती. पण आता पक्षाने निर्णय घेतलाय. जुने नेते डावलून पडळकरांसारख्या व्यक्तीला संधी दिली आहे. त्यांनी गो बॅक मोदी म्हटलं होतं लोकसभेत.

मी नाराज तर आहेच. मी पक्षश्रेष्ठींकडे माझी नाराजी व्यक्त केली. यामुळे वर्षानुवर्षं काम केलेले निष्ठावान नाउमेद होतात. माधव भंडारी आहेत, पंकजा मुंडे आहेत, असे अनेक नेते आहेत. दुःख वाटतं, पण पक्षाचा निर्णय झाला आहे. मला इतर पक्षांकडून ऑफर्स आहेत. पण मी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाण्याचं यापूर्वी टाळलं होतं असंही खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS