भाजपचा राज्यात मेगाप्लॅन, लवकरच हायटेक रॅली सुरु करणार !

भाजपचा राज्यात मेगाप्लॅन, लवकरच हायटेक रॅली सुरु करणार !

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्गावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत, मात्र योग्य वैद्यकीय सुविधा लोकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आता भाजप राज्यभर लवकरच हायटेक रॅली सुरु करणार आहे.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्लॅननुसार, भाजप राज्यातील पाच लाख कुटुंब आणि 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे. केंद्रातील पॅकेजमधून काय मिळालं आणि काय हवं याबाबत भाजप व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्हर्च्युअल रॅलीची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातील सहा विभागात ही व्हर्च्युअल रॅली घेण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात लवकरच या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील नेते या व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

COMMENTS