ब्रेकिंग न्यूज – मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप 22 जागांवर आघाडीवर!

ब्रेकिंग न्यूज – मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप 22 जागांवर आघाडीवर!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही दिग्गज नेते आघाडीवर आहेत. तर काही पिछाडीवर आहेत. पिछाडीवरील नेते मागेच राहिले तर त्यांची हार होऊ शकते. महाराष्ट्रात 288 जागांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली असून या सुरुवातीलाच भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे. बोरीवलीतून भाजपचे सुनील राणे आघाडीवर आहेत. तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत. मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे या आघाडीवर आहेत.तसेच भाजप आणखी काही  जागांवर भाजपचे नेते आघाडीवर आहेत.

COMMENTS