भाजपा लोकसभा का जिंकला ? वाचा विजयाची अराजकीय कारणे !

भाजपा लोकसभा का जिंकला ? वाचा विजयाची अराजकीय कारणे !

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. भाजपने दावा केल्याप्रमाणे त्यांनी 300 पारचा आकडा पार केला. तर एनडीएनं तब्बल 350 चा आकडा पार केला. 2014 पेक्षाही अभूतपूर्व यश भाजपाला आणि एनडीएला मिळालं आहे. भाजपाचे समर्थक हे ठरल्याप्रमाणे यश मिळाल्याचं सांगत आहेत. तर विरोधकांना भाजपाचं यश पचवणं अवघड जातंय. भाजपला 200 ते 225 च्या आसपास जागा मिळतील असा विरोधकांचा अंदाज होता. मात्र तो सपशल खोटा ठरलाय. मग भाजपाच्या अभूतपूर्व यशाची कारणे काय आहेत ते पाहूया….

भाजपाच्या विजयाची कारणे ?

2014 च्या आधीपासून आणि सत्तेत आल्यानंतरही शास्त्रीय पद्धतीनं मतदारांच्या मानसिकतेचा सातत्याने वेध घेणे

प्रसार माध्यमांचा अत्यंत चपख उपयोग करुन घेणे

शास्त्रीय पद्धतीनं सर्व्हे करुनच तिकीट वाटप करणे

तिकीट वाटप करताना विविध सर्व्हेंचा रिपोर्ट डावलून नेत्यांच्या शिफारशीला महत्व नाही

बूथलेवल पासून काही वर्षांपासून योग्य नियोजन करणे आणि त्याची अंमलबजावणी

निवडणूक विकासाच्या मुद्यावर न येऊ देणे

देशभक्ती, पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक यांचा पुरेपुर वापर

भारतीय जनता पार्टीनं 2012 पासूनचं निवडणूक प्रचार हायकेट केला होता. त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर तर होताच पण मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचा शास्त्रीय पद्धतीनं वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसारच ध्येयधोरण आखली. याचा फायदा पक्षाला 2014 च्या निवडणुकीत तर झालाच. पण सत्ता आल्यानंतरही भाजपानं या प्रकारे सातत्याने मतदारांच्या मानसिकतेचा अभ्यास सुरु ठेवला. गेल्या पाच वर्षात ज्या ज्या  काही छोटमोठे राजकीय निर्णय असतील, घडामोडी असतील किंवा समाजमनावर परिणाम करणा-या घटना असतील त्यांची शास्त्रीय पद्धतीने माहिती गोळा करणे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यामुळे भाजपला फायदा झाला.

या पद्धतीनं माहिती गोळा केल्यानंतर सरकारविषयी सकारात्मक वातावरण कसे तयार होईल यासाठी माध्यमांचा वापर केला. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डीजीटल मीडिया, आणि सोशल मीडिया यांचा अत्यंत चपलख वापर करुन घेतला. ज्या ज्या प्रकरण सकारवर शेकेल असं वाटलं तिथे तिथे त्यांनी पायबंद घालण्याचा प्रय़तन केला. त्यामुळे अनेक मुद्दे विरोधातील असले तरी सरकारविरोधात वातावरण तयार झाले नाही. जो थेट राजकारणाशी संबंध नाही असा घटक मग तो शहरी भागातील राजकारणापासून फटकून राहणारा घटक  असो किंवा कनिष्ठ मध्यमवर्ग असो त्याला मोदी आणि भाजपा सरकारबद्ल कायमच आकर्षण राहिले. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.

तिकीट वाटप करतानाही नेत्यांच्या किंवा हायकमांडच्या शिफारशीला भाजपमध्ये मदत्व दिलं जात नाही. निवडून येण्याची क्षमता याच निकषावर तिकीट वाटप होते. शास्त्रौक्त पद्दतीनं पोलिटिकल सर्व्हे करुनच उमेदवार निश्चित केलं जातं. याचं ताज उदाहरण म्हणून सुजय विखे पाटील यांना पक्षात घेऊन तिकिट दिलं गेलं. मात्र तिकडे मोहिते पाटील घरण्याला पक्षात घेऊनही लोकसभेचं तिकीट दिलं गेले नाही. याच्या उलटी परिस्थिती काँग्रेसमध्ये होती. तिकीट वाटपाचा हाकमडांडचा हस्तक्षेप, शास्त्रीय सर्व्हे न करता ठोकताळ्यांवर तिकीट वाटप करणे. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला.

याशिवाय भाजपनं लोकसभा निवडणुकीची खूप आधीपासून तयारी केली होती. बूधनिहाय तयारी केली होती. A,B,C,D अशी बूथची विभागणी केली होती. A म्हणज्ये भाजपसाठी अत्यंत सोपा बूथ. त्या ठिकाणी फारशी ताकद घालवायची नाही. D म्हणज्ये भाजपसाठी अत्यंत कठीण बूथ या ठिकाणी कितीही ताकद लावली तरी फायदा होणार नाही असे बूथ. त्यामुळे तिथे शक्ती वाया घालवून उपयोग नाही. राहिलेले B आणि  C या बूथवर सर्वाधिक लक्ष केंद्रीय केले आणि त्याचा पक्षाला मोठा फायदा झाला. थोडक्यात काय तर अत्यंत माक्रोलेव्हलला भाजपनं तयारी केली होती. त्याचाही फायदा झाला.

मतदारांच्या बदलत्या अपेक्षा, मतदारांची मानसिकता याचा आधुनिक पद्धतीने  अभ्यास करुन त्यानुसार धोरणे आखणे यामुळे भाजपला फायदा होतोय. अनेक विरोधातील मुद्दे असतानाही भाजपा विरोधात वातारवण त्यामुळेच तयार झाले नाही. देशभक्ती, पुलवावा हल्ला, एअर स्ट्राईक याचा पुरेपुर वापर भाजपने केला. बेकारीचा अत्यंत गंभीर प्रश्न समोर उभा आहे. गेल्या 45 वर्षातील बेकारीचा सर्वाधिक दर भाजपाच्या काळात आला आहे. दर वर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन हवेतच विरलेलं आहे. शेतकरी, शेतीविषय यासारखे असंख्य प्रश्न भाजपाच्या विरोधात होते. पण मोदी आणि भाजपाने लोकसभा निवडणूक या विषयांपासून दूर नेली. ती स्थानिक पातळीवच्या विषयांवरही केद्रीत राहिली नाही. त्याचा फायदा भाजपाने करुन घेतला. भाजपला उघडे करण्यात विरोधीपक्षही कमी पडला हेही खरचं आहे.

COMMENTS