भाजपचा विजय झाला तर ईव्हीएमचा करिश्मा – राज ठाकरे

भाजपचा विजय झाला तर ईव्हीएमचा करिश्मा – राज ठाकरे

डोंबिवली – गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचा ट्रेंड आहे. उद्या जर गुजरातचा मोठा विजय झाला तर हा करिश्मा ईव्हीएम मशीनचा असेल असा संशय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी आज संध्याकाळी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. फेरीवाल्यांकडून पोलिसांना 2 हजार कोटींचा हफ्ता मिळतोय असा आरोपही यावेळी राज ठाकरेंनी केलाय.

मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक फुटल्यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केलाय. कल्याण डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक आणि सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन केडीएमसीमधल्या नगरसेवकांपद्दल चिंता नाही असं स्पष्ट केलं.

त्यानंतर त्यांनी फेरीवाले हटवा आंदोलनावर प्रशासनावर टीका केलीये. आमच्या आंदोलनानंतर रेल्वे स्टेशन फेरीवाले मुक्त झाले. पण आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलं म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. याबद्दल कुणी काही बोलत नाही. मलाच विचारलं जातंय की तुमच्या आंदोलनानंतर फेरीवाले पुन्हा बसले ?, आंदोलन करणे आमचं काम आहे. फेरीवाले पुन्हा बसू न देणे हे प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाला याबद्दल कुणी जाब विचारत नाही.  फेरीवाल्यांकडून पोलिसांना कोट्यवधींचा हप्ता मिळतो. हा हप्ता वर्षांला 2 हजार कोटी इतका आहे मग फेरीवालेमुक्त स्टेशन कसे होणार असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

COMMENTS