ऑनलाईन पद्धतीच्या निवडणूकीत भाजपची बाजी

ऑनलाईन पद्धतीच्या निवडणूकीत भाजपची बाजी

नागपूर : . नागपूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदाची निवडणूक झाली. सर्व नगरसेचक मोबाईल आणि लॅपटॉपवरून निवडणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र, भाजपच्या उमेदवारांने बाजी मारली. दयाशंकर तिवारी यांची महापौरपदी निवड झाली आहे.

नागपूर महानगरपालिकेची आज महापौर निवड झाली. ही निवडणूक पहिल्यांदाच आनलाईन पध्दतीने झाली. भाजपच्या वतीने दयाशंकर तिवारी यांचा अर्ज दाखल झाला. तर काँग्रेसकडून दोन अर्ज भरण्यात आले होते. मात्र, एक अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतला. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली. यावेळी दयाशंकर तिवारी यांना 107 मते, काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27, तर बसपा नरेंद्र वालदे यांना 10 मते मिळाली. यावेळी पाच सदस्य अनुपस्थित होते.

COMMENTS