इतर पक्षांचा दाखला देत भाजपच्या महिला पदाधिकाय्राने टोचले पक्षातील नेत्यांचे कान !

इतर पक्षांचा दाखला देत भाजपच्या महिला पदाधिकाय्राने टोचले पक्षातील नेत्यांचे कान !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला पदाधिकाय्रानं पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. महिलांना पुरेशा प्रमाणात लोकसभा निवडणुकांची उमेदवारी न दिल्याबद्दल भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी केवळ 13 महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याबद्दल शायना एनसी नाराज आहेत. क्षमता दाखवण्यासाठी संधी मिळण्याची आवश्यकता आहे. प्रतिभा दिसण्याची गरज आहे. निवडणुकीच्या आखाड्यात अधिकाधिक महिलांना उतरवण्याची गरज शायना यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान यावेळी तृणमूल काँग्रेस आणि बीजेडीचा दाखला देत शायना एनसी यांनी स्वपक्षासह इतर प्रमुख पक्षांचे कान टोचले आहेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 41 टक्के, तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना उमेदवारी दिल्याबद्दल शायना एनसी यांनी कौतुक केलं. इतर पक्षांनी या नेत्यांचा कित्ता गिरवावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे.

COMMENTS