आगामी निवडणुकीत भाजप ‘या’ सहा खासदारांचा पत्ता कट करणार ?

आगामी निवडणुकीत भाजप ‘या’ सहा खासदारांचा पत्ता कट करणार ?

मुंबई –  आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध सध्या सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना लागले आहेत. या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेत्यांकडून निकराचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही याचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वे घेणार आहेत. अशीच स्थिती भाजपमध्ये देखील पहायला मिळत आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला नाही याबाबतची उत्सुकता अनेक नेत्यांना लागली आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपमधील काही विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. यापैकी सहा खासदारांचा पक्षाकडून पत्ता कट केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सुमार कामगिरी असल्याचं कारण देत पंकजा मुंडे यांची बहिण प्रीतम मुंडे, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांना पक्षाकडून आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. तर आणखी दोन खासदारांनाही उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती आहे. परंतु त्यांची नावं अजून समोर आली नाहीत. या खासदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात येणार असल्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवर झाला असल्याची माहिती आहे. प्रीतम मुंडे व रक्षा खडसे या दोघीही निव्वळ घराणेशाहीवर निवडून आलेल्या आहेत. पण त्यांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे मत भाजपच्या श्रेष्ठींमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे व एकनाथ खडसे अशा दोघांच्याही प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

 

 

COMMENTS