एकनाथ शिंदेंवर अघोरी जादूटोणा

एकनाथ शिंदेंवर अघोरी जादूटोणा

पालघर : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नात राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला आहे. मात्र अजूनही अघोरी जादूटोणा या सारखे प्रकार सुरु असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आल्याने सर्वत्र एकच, खळबळ उडाली आहे.

विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा, या हेतून अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

शिवसेनेचे नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. आरोपी जादूटोणा करून लोकांना फसवून पैसे उकळत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही, असे म्हटले आहे.

 

COMMENTS