बाहेर पडताना मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरण बंधनकारक, अन्यथा कारवाई करण्याची महापालिकेची नोटीस!

बाहेर पडताना मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरण बंधनकारक, अन्यथा कारवाई करण्याची महापालिकेची नोटीस!

मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेनं पाऊल उचललं असून रस्त्यावर, मार्केट, हॉस्पिटल, ऑफिस कुठेही जाणाऱ्या लोकांनी मास्क वापरावा तसेच खासगी किंवा ऑफिसच्या वाहनात फिरणाऱ्या लोकांनी मास्क वापरावा, कोणतीही मिटिंग,बैठकीला उपस्थित राहताना मास्क वापरनं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबतची नोटीस महापालिकेनं काढली आहे. हे नियम न पाळल्यास कलम 188 प्रमाणे पोलीस आणि महापालिकेचे अधिकाय्रांकडून कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.

दरम्यान जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापराच, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. किंवा स्वच्छ कपडा, रुमाल वापरा. मात्र हे मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हे मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी ते स्पष्ट केलं आहे. वापरलेला मास्क कुठेही फेकू नका. सुरक्षित जागा बघून असे मास्क नष्ट करा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS