मुंबई महापालिकेच्या पाेटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय!

मुंबई महापालिकेच्या पाेटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय!

मुंबई – महापालिकेच्या मानखूर्द प्रभाग क्रमांक १४१ पाेटनिवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लाेकरे विजयी झाले आहेत. भाजपच्या बबलू पांचाळ यांचा १३८५ मतांनी पराभव झाला आहे.
विठ्ठल लाेकरे यांना ४४२७ मते पडली तर ३०४२ मते पडली आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होत्. एकूण १८ हजार ५४ पुरुष आणि १४ हजार ३२ महिला मतदार असे एकूण ३२ हजार ८६ मतदार या प्रभागात असून त्यापैकी १३,४७६ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये, ७३४४ पुरुष मतदार आणि ६१३२ महिला मतदारांचा समावेश होता.

दरम्यान काँग्रेसमध्ये असताना विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पुन्हा नगरसेवकपदाच्या निवडणुकीत उतरले होते. यामध्ये त्यांचा विजय झाला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीत १४.८७ टक्क्यांनी मतदान घटले. मतदान घटले असले तरी या निवडणुकीत भाजपचे उमेदवार बबलू पांचाळ यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात होते.

शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचेही या प्रभागात वर्चस्व असल्याने या दोन्ही उमेदवारांमध्येच ही लढत रंगली होती. पांचाळ व लोकरे यांनी आपलाच विजय होणार आहे, असा ठाम दावा केला होता. परंतु या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून या ठिराणी पुन्हा एकदा लोकरे नगरसेवक झाले आहेत.

COMMENTS