मुंबई महापालिकेतील अधिकाय्रांविरोधात महापौर किशोरी पेडणेकर यांचे दालनातच आंदोलन !

मुंबई महापालिकेतील अधिकाय्रांविरोधात महापौर किशोरी पेडणेकर यांचे दालनातच आंदोलन !

मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांविरोधात महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर नगरसेवकांसह महापौर दालनातच
आंदोलन केले आहे. सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी गैरहजर राहील्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. प्रभाग समितीची निवडणूक आज होणार होती. मात्र प्रशासनाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या महापौरांनी दालनात अधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले.

यावर विरोधकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे. मुंबईच्या महापौर किती हतबल आहेत, त्यांना त्यांचेच अधिकारी निवडणुकीसाठी हजर न राहिल्याने आज त्यांच्याच दालनासमोर आंदोलन करावे लागले, हा सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक की त्यांच्या कर्माची फळे, असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.

COMMENTS