ब्रिटनमध्ये पुन्हा हुजूर पक्षाचे सरकार, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना मोठं यश!

ब्रिटनमध्ये पुन्हा हुजूर पक्षाचे सरकार, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना मोठं यश!

ब्रिटन – ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा हुजूर पक्षाचे सरकार आले आहे. प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाला 1983 नंतरचं सर्वात मोठं यश मिळालं आहे. आतापर्यंत 650 जागांपैकी 358 जागांवर हुजूर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर मजूर पक्षाला 203 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 326 जागांचा आकडा असल्यामुळे या निवडणुकीत 358 जागांवर विजय मिळवून हुजूर पक्षाने बहूमत सिध्ध केलं आहे.

या निकालांमुळे ब्रिटनचा युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी 28 देश सदस्य असलेल्या युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी हुजूर पक्षाला बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना केलं होतं.
त्यामुळे बोरिस जॉन्सन आपला शब्द पाळणार का हे पाहण गरजेचं आहे.

बोरिस जॉन्सन

दरम्यान या निवडणुकीत हुजूर आणि जेरेमी कॉर्बीन यांच्या मजूर पक्षामध्ये मुख्य लढत पहायला मिळाली. या निवडणुकीदरम्यान देशभरात मजूर पक्षाने एकूण 11 % मतं गमावली आहेत. मजूर पक्षाचे जेरेमी कोबेन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. वर्षानुवर्ष असलेले मजूर पक्षाने आपले बालेकिल्ले या निवडणूकीत गमावले आहेत. त्यामुळे या पराभवानंतर कोबेन यांच्यावर मजूर पक्षातून तूफान टीका केली जात आहे. या टीकेनंतर यापुढे कधीही मजूर पक्षाचे नेतृत्व करणार नसल्याचं जेरेमी कोबेन यांंनी म्हटलं आहे.

जेरेमी कॉर्बीन

या निवडणुकीदरम्यान मजूर पक्षाचे प्रमुख जेरेमी कॉर्बीन यांनी ब्रेक्झिटवर नव्यानं सार्वमत घेण्याचं आणि  सर्व सुविधांचं राष्ट्रीयकरण करण्याचं आवाहन केलं होतं. परंतु या आवाहनाला ब्रिटनची जनता बळी पडली नसल्याचं दिसून आली आहे.

हुजूर पक्ष किंवा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष

हुजूर पक्ष किंवा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष हा युनायटेड किंग्डममधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. 1834 साली टोरी पक्षापासून हुजूर पक्षाची निर्मिती झाली. आजच्या घडीला ब्रिटनमधील दोन प्रमुख पक्षांपैकी हुजूर एक असून मजूर पक्ष हा दुसरा प्रबळ पक्ष आहे.

मजूर पक्ष (Labour Party)

मजूर पक्ष हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.

COMMENTS