राष्ट्रवादीच्या बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो !

राष्ट्रवादीच्या बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो !

बुलडाणा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारच्या मंचावर असणार बॅनरवर हा फोटो पहावयास मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट-बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रे वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरच्या असलेल्या बैनरवर चक्क मोक्का कायद्या अंतर्गत अटक असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मंचावर लावण्यात आलेल्या या  फोटोमुळे सभेला आलेल्या नागरिकांमध्ये सभेवेळी कुजबुज सुरू होती.

दरम्यान मोक्का कायद्या अंतर्गत कार्रवाई झालेला आरोपी दीपक मानकर हा राष्ट्रवादी पक्षाचा विद्यमान नगरसेवक असून अशाप्रकारे राष्ट्रवादी आरोपीचा फोटो बॅनरवर टाकून त्याला समर्थन तर करीत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण ?

पुणे येथील शहर पोलिस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी २ जुन रोजी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे गाडीसमोर आत्महत्या केली होती. तर  आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहले होते. रस्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता. यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर  विरोधात मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर दिपक मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता,  मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, . परंतु सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळाले होते.

दरम्यान मानकर हे जेलमध्ये आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्या व्यतीरिक्त मानकर यांच्यावर अन्य गुन्हे ही दाखल असून याच आरोपीचा फोटो बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट-बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रे वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरील बॅनरवर लावण्यात आले होते. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

COMMENTS