बुलडाणा लोकसभेत शिवसेना-भाजपला धक्का, राष्ट्रवादी मारणार बाजी ?

बुलडाणा लोकसभेत शिवसेना-भाजपला धक्का, राष्ट्रवादी मारणार बाजी ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. तत्पपूर्वी या निकालाबाबत राजकीय नेत्यांकडून आणि राजकीय अभ्यासकांकडून विविध अंदाज मांडले जात आहेत. राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का बसणार असून याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लावलेल्या ताकदीमुळे बुलडाण्यात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरन्यान बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, वंचित बहूजन आघाडीचे बळीराम सिरस्कार आणि राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात मुख्य लढत झाली. या निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात लाट दिसून आली. तसेच वंचित बहूजन आघाडीमुळे मतामध्ये फूट पडली असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विजयासाठी मोठी ताकद लावली असल्याचं पहावयास मिळाले. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

COMMENTS