विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, 10 पैकी फक्त एका जागेवर विजय !

विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, 10 पैकी फक्त एका जागेवर विजय !

नवी दिल्ली – देशभरातील विधानसभेच्या दहा जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असल्याचं दिसून येत आहे. कारण उत्तराखंडमधील थराली मतदारसंघ वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपला अपयश आलं आहे.  झारखंडमधील दोन्ही जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमदेवारांनी बाजी मारली आहे. गोमीया मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बबीता देवी यांचा विजय झाला आहे. तर दुस-या जागेवर सिल्ली मतदारसंघात जेएमएमच्याच सीमा देवी यांचा विजय झाला आहे. त्यामुळे याठिकाणीही भाजपला धक्का बसला आहे.  बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील निकाल हाती आला असून बिहारमध्ये आरजेडीचा विजय झाला आहे. तर उत्तर प्रदेशात सपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. उत्तर प्रदेशात नूरपूरमध्ये सपाचे नईम उल हसन यांचा 6211 मतांनी विजय झाला आहे. तर बिहारमध्ये आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी जनतेला धन्यवाद दिले असून भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. बिहारमधील जनात लालूजींच्या सोबत असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. तर मेघालयात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असल्याची माहिती आहे. तसेच पश्चिम बंगालमधील महेशतला मतदारसंघात टीएमशी आघाडीवर असल्यामुळे याठिकाणी टीएमशीच्या उमेदवाराचा विजय होण्याची दाट शक्यता आहे.

देशभरातील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल

कर्नाटक – आरआरनगर – काँग्रेसचा विजय

उत्तराखंड – थराली – भाजप विजयी

केरळ – चेंगानूर – माकपचा विजय

मेघालय – अंपाती – काँग्रेसचा विजय

उत्तर प्रदेश – नूरपूर – एसपीचा विजय

बिहार – जोकीहाट – आरजेडीचा विजय

पंजाब – शाहकोट – काँग्रेसचा विजय

झारखंड – सिल्ली – जेएमएमचा विजय

झारखंड – गोमिया – जेएमएमचा विजय

पश्चिम बंगाल – महेशतला – टीएमशी आघाडीवर

 

COMMENTS