झारखंडमध्ये भाजपला धक्का, दोन्ही जागांवर ‘या’ पक्षानं मारली बाजी !

झारखंडमध्ये भाजपला धक्का, दोन्ही जागांवर ‘या’ पक्षानं मारली बाजी !

नवी दिल्ली – देशभरातील चार लोकसभा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. झारखंड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला असून याठिकाणच्या दोन्ही जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमदेवारांनी बाजी मारली आहे. गोमीया मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बबीता देवी यांचा विजय झाला आहे. तर दुस-या जागेवर सिल्ली मतदारसंघात जेएमएमच्याच सीमा देवी यांचा विजय झाला आहे. त्यामुळे याठिकाणीही भाजपला धक्का बसला आहे.  बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील निकाल हाती आला असून बिहारमध्ये आरजेडीचा विजय झाला आहे. तर उत्तर प्रदेशात सपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. उत्तर प्रदेशात नूरपूरमध्ये सपाचे नईम उल हसन यांचा 6211 मतांनी विजय झाला आहे. तर बिहारमध्ये आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी जनतेला धन्यवाद दिले असून भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. बिहारमधील जनात लालूजींच्या सोबत असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. तर मेघालयात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असल्याची माहिती आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर

झारखंड – गोमिया, सिल्ली मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवारांचा विजय

उत्तर प्रदेश – नूरपूर – सपाचे नईम उल हसन यांचा 6211 मतांनी विजय

पंजाब – शाहकोट – काँग्रेस आघाडीवर

बिहार – जोकीहाट  – आरजेडीचा विजय

केरळ – चेनगन्नूर – सीपीआय आघाडीवर

महाराष्ट्र – पलूस-कडेगाव – काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे बिनविरोध निवड

मेघालय – अंपाती – काँग्रेस आघाडीवर

उत्तराखंड – थराली – भाजप आघाडीवर

प. बंगाल – महेशतला – टीमसीचे दुलाल चंद्रदास आघाडीवर

कर्नाटक – आरआरनगर- काँग्रेस

 

 

 

COMMENTS