देशभरातील 14 पैकी भाजप आणि मित्रपक्षाला फक्त 3 जागांवर विजय, 11 जागांवर पराभव !

देशभरातील 14 पैकी भाजप आणि मित्रपक्षाला फक्त 3 जागांवर विजय, 11 जागांवर पराभव !

देशभरात झालेल्या लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 10 अशा पोटनिवडणुकांचा आज निकाल लागला. त्यामध्ये भाजपला एका लोकसभेच्या जागेवर आणि एका विधानसभेच्या जागेवर विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रातील पालघर या लोकसभेच्या जागेवर भाजपनं यश मिळवलं. तर उत्तराखंडमधील विधानसभेच्या एका जागेवर भाजपला विजय मिळवता आला आहे. तर नागालँडमधील लोकसभेच्या एका जागेवर भाजपच्या मित्र पक्षाची सरशी झाली आहे. लोकसभेच्या इतर दोन जागांवर आणि विधानसभेच्या तब्बल 9 जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यापूर्वी लोकसभेच्या चारही जागा भाजप आणि मित्र पक्षांकडे होत्या. त्यामध्ये दोन जागांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया आणि उत्तर प्रदेशातील कैराना या लोकसभेच्या दोन जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला यश मिळालं आहे. तर कैराना लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराला यश मिळालं आहे. याठिकाणी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस यांनी राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. उत्रप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपचा हा सलग तिस-या जागेवरचा पराभव आहे. या आधी गोरखपूर या मंत्र्यामंत्र्यांच्या आणि फूलपूर या उपमुख्यमंत्र्यांच्या जागेवर भाजपला पराभवाची चव चाखावी लागली होती.

विधानसभेच्या 10 जागांपैकी कर्नाटकातील एक जागा वगळता इतर 9 जागांवर पोटनिवडणुक झाली. कर्नाटकामध्ये एका जागेवर मतदान झालं नव्हतं. त्या आर के नगर ज्या जागेवर काँग्रेसनं बाजी मारली आहे. पोटनिवडणुकील 9 जागांपैकी यापूर्वी 4 जागा या भाजप आणि मित्र पक्षांकडे होत्या. मात्र त्यापैकी भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. भाजप आणि मित्र पक्षाला तब्बल 8 जांगावर पराभवाची चव चाखावी लागली आहे. उत्तर प्रदेशातील नूरपूर ही जागा या आधी भाजपकडे होती. आता तिथे समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. पंजाबमधील एक जागा अकाली दलाकडे होती. तिथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. बिहारमधली जागा जेडीयूकडे होती तिथे आरजेडीचा उमेदवार विजयी झाला आहे. तर मेघालयात मुख्यमंत्री संगमा यांनी एका जागेवरील राजीनामा दिल्यामुळे तिथे एक जागा खाली झाली होती. ती जागाही काँग्रेसनं जिंकली आहे. पश्चिम बंगालमधील एक जागा टीएमसीने, झारखंडमधील दोन्ही जागा झारखंड मुक्ती मोर्चाने आणि केरळमधील एक जागा माकपने तर उत्तराखंडमधील एक जागा भाजपने जिंकली आहे. महाराष्ट्रातील पलूस कडेगावची जागा काँग्रेसने यापूर्वीच बिनविरोध जिंकली होती.

मतदान झालेली लोकसभा पोटनिवडणूक – एकूण जागा 4

यापूर्वी भाजप आणि मित्र पक्षांकडे होत्या चारही जागा

यावेळी भाजप आणि मित्रपक्षाला दोन जागा मिळाल्या.

 

विधानसभा पोटनिवडणूक – एकूण जागा – 10

यापूर्वी भाजप आणि मित्र पक्षाकडे – 4

यावेळी जिंकलेल्या जागा – 1

COMMENTS