साखर उद्योगांना केंद्र सरकारकडून दिलासा, 5,500 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर !

साखर उद्योगांना केंद्र सरकारकडून दिलासा, 5,500 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर !

नवी दिल्ली – साखर उद्योगाला केंद्र सरकारनं  दिलासा दिला असून साडेपाच हजार कोटी रुपये पॅकेज मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं याबाबत पॅकेजला मान्यता दिली आहे. देशात मोठ्याप्रमाणात सरप्लस साखर आहे.देशात साखरेचे दर कोसळलेले आहेत. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी शेतक-यांचे पैसे चुकते केलेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांचं जवळपास १३ हजार कोटी रुपयांचं फरकाची रक्कम देणं बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. द

रम्यान २०१७ -१८ या वर्षात तब्बल ३२ मिलियन मेट्रिक टनाचं उत्पादन झालं होतं. त्यामुळे जवळपासा १० मिलिटन मेट्रिक टन साखर शिल्लक असून यापूर्वी जूनमध्ये सरकारनं साखर उद्योगासाठी साडेआठ कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं. तसेच आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका असून पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. साखर उत्पादक शेतक-यांची नाराजी दूर करण्याचा प्रय़त्न सरकारनं यातून केला असल्याचं दिसत आहे

COMMENTS