आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे. यासह इतरही काही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

1) दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.

2) स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी.

3) मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.

4) पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.

COMMENTS