राज्यातील ‘या’ कॅबिनेट मंत्र्याची झाली कोरोना टेस्ट!

राज्यातील ‘या’ कॅबिनेट मंत्र्याची झाली कोरोना टेस्ट!

लातूर – कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही ‘कोरोना’च्या रूग्णात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. अशातच पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाची टेस्ट करुन घेतली आहे. काही दिवसांपासून अस्वस्थता, ताप, खोकला येत होता त्यामुळे ही लक्षणे पाहून अमित देशमुख यांनी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन कोरोनाची टेस्ट करुन घेतली. या तपासणीत ते कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले.

दरम्यान अमित देशमुख याबाबत ट्वीट केलं असून मला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. ताप, खोकलाही आला होता. ही लक्षणे पाहून मी तातडीने डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी ‘कोरोना’ची तपासणी करण्यास सांगितले. या तपासणीत मी कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले. सध्या मी पूर्ण बरा आहे. काळजी करू नका, असं अमित देशमुख यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे.

COMMENTS