उमेदवाराची मतदारांना चप्पल भेट, “आश्वासन पूर्ण केलं नाही तर यानेच मारा !”

उमेदवाराची मतदारांना चप्पल भेट, “आश्वासन पूर्ण केलं नाही तर यानेच मारा !”

नवी दिल्ली – एका अपक्ष उमेदवारानं आपल्या मतदारसंघातील मतदारांना चक्क चप्पलची भेट दिली आहे. एवढच नाही तर आश्वासन पूर्ण केलं नाही तर याच चप्पलने मारण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं आहे. तेलंगाणा येथील कोरतला इथं अपक्ष उमेदवार अकुला हनुमंत या अपक्ष उमेदवाराने ही करामत केली असून त्यांच्या या चप्पल भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ जागांसाठी इथं मतदान होणार असून ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान अकुला हनुमंत हे आपल्या मतदारसंघातील मतदारांची भेट घेऊन चपल भेट देत आहे. मतदारांना भेटण्याआधी हनुमंत हे आश्वासनाचे पत्रक हाती देऊन त्यानंतर आपल्यासोबत आणलेल्या बॉक्समधून एक चपल भेट देतात. हे पाहून मतदारही गोंधळात सापडले आहेत. जर आश्वासन पाळलं तर याच चप्पलेनं मला मारा असं आवाहनच हनूमंत यांनी केलं आहे.

COMMENTS