एकाच नावाचे चार उमेदवार, कोणाला मतदान करायचे?, मतदारांमध्ये संभ्रम!

एकाच नावाचे चार उमेदवार, कोणाला मतदान करायचे?, मतदारांमध्ये संभ्रम!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मैदानात उतरले आहेत. काही नेते पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर काही नेते अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षात आहे याचा ताळमेळ मतदारांना लागत नाही. अशातच आता एकाच मतदारसंघात एकाच नावाचे चार उमेदवार आहेत. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षाचा आणि कुणाला मतदान करायचे अशी संभ्रमावस्था मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले एकूण ४ उमेदवार उभे आहेत. संजय दगडू कदम, अपक्ष, संजय सीताराम कदम, अपक्ष, संजय संभाजी कदम,अपक्ष आणि चौथे उमेदवार संजयराव वसंत कदम हे राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याला मतदान करायचे असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.

एवढच नाही तर याच मतदारसंघात आणखी दोन उमेदवार एकाच नावाचे आहेत. यामध्ये शिवसेनेकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. योगेश कदम हे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पूत्र आहेत. तर याच मतदारसंघातून नामसाधर्म्य असलेले आणखी एक योगेश कदम हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत.

COMMENTS