राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर, ‘यांना’ दिली उमेदवारी !

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर, ‘यांना’ दिली उमेदवारी !

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीने पुरेसं पाठबळ नसल्यामुळे उमेदवार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे. तसेच भाजपप्रणीत ‘रालोआ’चा उमेदवार म्हणून जनता दल (संयुक्त) चे खासदार हरिवंश नारायण सिंह यांचे नाव निश्चित झाले आहे. सत्ताधारी रालोआचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरही विरोधकांचा उमेदवार कोण याबाबतची मंगळवारी अनिश्चितता कायम होती. परंतु आज काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे आता विरोधकांनी बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी कोणत्याही आघाडीकडे बहूमताचा आकडा नसल्यामुळे ही निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या राज्यसभेत २४४ सदस्य असून  कोणत्याही आघाडीला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी १२३ मतांची गरज आहे. दोन्हीकडील संख्याबळ पाहता ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं दिसत आहे. कारण ‘रालोआ’कडे ११५ सदस्यांचा पाठिंबा मिळू शकतो तर, विरोधकांच्या उमेदवाराला ११३ मते मिळू शकतात. त्यामुळे उरलेले १६ मते कुणाच्या पारडय़ात पडणार याबाबत अनिश्चितता आहे. तसेच या निवडणुकीत शिवसेनेनं आपला पाठिंबा कोणत्याच आघाडीला जाहीर केला नसल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS