भीषण अपघातात भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचा जागीच मृत्यू ! व्हिडिओ

भीषण अपघातात भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचा जागीच मृत्यू ! व्हिडिओ

मुंबई – नाशिक महामार्गावर बस आणि  कार मध्ये जोरदार धडक होऊन  भीषण अपघात झाला. या  अपघातात भारतीय जनता पार्टी चे  ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ वामन लसने यांचा जागीच मृत्यू झाला.  मुबंई नाशिक महामार्गावरील  सरावली पाडा येथून  गुरुनाथ लसने हे सायंकाळच्या सुमाराला भिवंडी वरून घरच्या दिशेने आपल्या कार ने जात होते. त्याच सुमारास विरुद्ध दिशेने जाणाऱ्या  खाजगी बसच्या चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने गेली असता त्याच वेळी गुरुनाथ यांची कारला   बसने   मध्ये जोरदार धडक दिली, या भीषण अपघातात कार, आणि  बस रस्त्यालगत असलेल्या खोलगट भागात जाऊन आदळल्या, मात्र या भीषण अपघातात गुरुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला, तर  खाजगी बस मधील 15 ते 20 प्रवासी बचावले.

COMMENTS