फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचं नाट्य केलं, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं खळबळजनक वक्तव्य!

फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचं नाट्य केलं, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं खळबळजनक वक्तव्य!

नवी दिल्ली – भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यानं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करून 80 तासात केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवल्याचा दावा भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचा 40 हजार कोटींचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटींचा गैरवापर केला असता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर येऊन त्यांनी केंद्राचा निधी परत पाठवल्याचं अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 80 तासात फडणवीस यांनी राजीनामा दिला. आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहिती नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? ही योजना भाजपने याआधीच केली होती. जे घडलं ते सर्व पुर्वनियोजित होतं. त्यानुसार फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 तासात 40 हजार कोटी रुपये केंद्राला परत पाठवले आणि केंद्र सरकारचे पैसे वाचवले असंही हेगडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS