छगन भुजबळांचा ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार, कट्टर समर्थक आव्हान देण्याच्या तयारीत!

छगन भुजबळांचा ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार, कट्टर समर्थक आव्हान देण्याच्या तयारीत!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना त्याच्या मतदारसंघात धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. कारण भुजबळांच्या येवला मतदारसंघात त्यांना आपल्याच समर्थकांकडून आव्हान मिळणार असल्याचं दिसत आहे. भुजबळांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता भुजबळांना डावलून पक्ष शिंदे यांना उमेदवारी देणार का? हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान छगन भुजबळ हे गेल्या तीन टर्मपासून येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यंदा मात्र ते वैजापूर या औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांनी वैजापूरमधून लढावं यासाठी त्यांचे कार्यकर्तेही आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे येवला मतदारसंघातून शिंदे यांनी उमेदवारी मागितली असल्याचं बोललं जात आगे.

तसेच येवला मतदारसंघात शिवसेनेकडून चांगली बांधणी करण्यात आली आहे. जेलवारी केल्यानंतर भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वालाही धक्का बसला आहे. त्यामुळे हे आव्हान लक्षात घेता छगन भुजबळ दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे.

शिंदे यांच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणी कुठून उमेदवारी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे पक्षाचा जो आदेश येईल त्यानुसार मी निवडणूक लढेन, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS