दुर्दैवाने दोन वर्ष गणेशोत्सवासाठी हजेरी लावता आली नाही, छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत !

दुर्दैवाने दोन वर्ष गणेशोत्सवासाठी हजेरी लावता आली नाही, छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत !

मुंबई – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांनी आज अखिल अंजिरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ,माझगाव येथे गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी भुजबळ यांनी खंत व्यक्त केली आहे. दुर्दैवाने दोन वर्ष गणेशोत्सवासाठी हजेरी लावता आली नाही,पण आज या ठिकाणी उपस्थित आहे. याचा आनंद असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आगामी निवडणुकीत उत्साहाने सहभागी होऊन लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच बाप्पाकडून विजयाची अपेक्षा आणि विजय आम्हाला मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी भुजबळांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान छगन भुजबळ यांच्यासोबत यावेळी पंकज, समीर भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंब उपस्थित होते. भुजबळ हे गेल्या 50 वर्षाहुन अधिक काळापासून अंजिरवाडी सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष आहेत. दोन वर्ष अटकेत असल्यामुळे भुजबळ यांना अंजिरवाडी इथे गणेशोत्सवासाठी हजर राहता आले नव्हते. परंतु आज त्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली आहे.

 

COMMENTS