राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  शिवसेनेच्या वाटेवर ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर ?

नाशिक – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ सेनेत गेल्यास नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर मात्र भुजबळ यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

दरम्यान छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीनं मुंबईत संयुक्त बैठक बोलावली असून या बैठकीसाठी भुजबळांना तातडीने बोलावण्यात आले आहे. मतदारसंघाचा दौरा अर्धवट सोडून भुजबळ मुंबईला आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार की काँग्रेस राष्ट्रवादीचे नेचे त्यांची मनधरणी करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS