जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले ते संपर्कात आहेत, इतरही काही संपर्कात आहेत – छगन भुजबळ

जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले ते संपर्कात आहेत, इतरही काही संपर्कात आहेत – छगन भुजबळ

मुंबई – जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले ते संपर्कात आहेत, तसेच इतरही काही नेते संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला,लोकशाहीत हे चालत नाही. त्यामुळे लोकांनी आपलं मन बनवलं आहे. त्यांच्या शेवटाची कालपासून सुरुवात झाली असल्याची जोरदार टीकाही भुजबळ यांनी भाजपवर केली आहे.

तसेच पुढील लोकसभा असेल किंवा विधानसभा लोकांनी आता मन बनवलं आहे. जनता हुशार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेते. संपर्कात अनेक लोक आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले ते संपर्कात आहेत, इतरही काही संपर्कात आहेत. आमचे अनेक लोक गेले ते येतील, कदाचित त्यांचे लोकही येतील अशी माहितीही भुजबळ यांनी दिली आहे.

तसेच कुणाला काय जबाबदारी द्यायची हे पवार जाणतात, त्यांनी संघटनेत योग्य ते काम करावं.या सगळ्यांचं स्वागत आहे. काही वेळेला ते चुकले असल्याचंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS