छगन भुजबळ येवल्यातूनच लढणार पण…

छगन भुजबळ येवल्यातूनच लढणार पण…

नाशिक,येवला – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आगामी विधानसभा निवडणूक येवल्यातूनच लढणार आहेत. याबाबतची घोषणा स्वत: भुजबळ यांनी केली आहे. मात्र कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. गणपती उत्सवानिमित्त गणेश मंडळांना भेट देण्यासाठी भुजबळ आज येवला येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी येवल्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान शिवसैनिकांनी घोषणा देत भुजबळांचे स्वागत केले. भुजबळांनी लवकर सेनेत प्रवेश करावा अशी देखील त्यांनी मागणी केली.

दरम्यान गेली काही दिवसांपासून भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु आज येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची नाशिकमध्ये भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचं आश्वासन राऊत यांनी शिवसैनिकांना दिलं आहे.

सध्या राज्यातील राजकारणाचा उत्तर महाराष्ट्र हा केंद्र बिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा झाली. मी आहे तिथे बरं आहे. असं छगन भुजबळ यांनी स्वतः म्हटले आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही, सगळ्यांना पक्षात घायला. आम्ही पारखून नेत्यांना पक्षप्रवेश देत आहोत असंही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही.

COMMENTS