छगन भुजबळांचे अखेर ठरले!

छगन भुजबळांचे अखेर ठरले!

पुणे – पुणे येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. यावेळी भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
‘मी राष्ट्रवादीतच आहे. वावड्या उठवण्याचं काम माध्यमं करत आहेत. कोण सूत्र यांना काय सांगतोय, हे स्पष्ट करा म्हणावं. मी साहेबांसोबतच आहे आणि आज बैठकीला आलोय. आता बास इतकच,’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा खोडून काढल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीला या बैठकीला छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे बारामती होस्टेलवर दाखल आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची राज्यात जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात अर्थात शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा करण्यात आला होता.परंतु ही चर्चा सुरू असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मोठी घोषणा केली असून आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS