काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यास त्या फाईल पुन्हा उघडतील, छगन भुजबळांचा पंतप्रधान मोदींना इशारा!

काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यास त्या फाईल पुन्हा उघडतील, छगन भुजबळांचा पंतप्रधान मोदींना इशारा!

गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. प्रधानमंत्र्यांकडून निवडणूकांमध्ये कुणाला धमकावने योग्य नाही, त्यांनी हेही लक्षात ठेवावे की त्यांच्यावर तसेच अमित शाहावर किती गुन्हे आहेत, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास कदाचित पुनः फाइल्स उघड़तील असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. दोन दिवसापूर्वी गोंदिया येथे झालेल्या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी प्रफुल पटेल यांचे नाव न घेता तिहार जेलमध्ये कैद असलेल्या आरोपीमुळे त्यांची झोप उडाली असल्याचे विधान केले होते. त्यावर आज छगन भुजबल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान जस्टिस लोहिया यांचा मृत्यू कसा झाला याचीही फाइल्स उघड़तील, त्यामुळे नरेंद्र मोदी दमबाजी करीत आहेत. अच्छे दिन, 2 कोटी नोकय्रा, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात, जीएसटी या मुद्दावर त्यांनी जनतेला मतदान मागीतले आणि निवडून आल्यावर जनतेची फसवणूक केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS