शिवसेनेच्या उमेदवाराने घेतले भुजबळांचे आशिर्वाद!

शिवसेनेच्या उमेदवाराने घेतले भुजबळांचे आशिर्वाद!

नाशिक – इगतपुरी मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार निर्मला गावित यांनी आज छगन भुजबळ यांच्या पाय पडून त्यांचे आशिर्वाद घेतले आहेत. यावेळी छगन भुजबळांनीही ऑल द बेस्ट म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज भुजबळ इगतपुरी मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी गावित यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले.ज्येष्ठ असल्यानं नमस्कार करतात म्हणून मी पण भुजबळांचे आशिर्वाद घेतले असल्याचं गावित यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून काँग्रेसच्या सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या निर्मला गावित यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना याठिकाणी उमेदवारी दिली आहे. गावित यांनी उमेदवारी घोषित होताच जोरदार प्रचार सुरु केला आहे. आज प्रचारफेरीदरम्यान त्यांनी इगतपुरीत आलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS