उद्धव ठाकरे आणि चंद्रबाबू नायडूंमध्ये फोनवरुन चर्चा ?

उद्धव ठाकरे आणि चंद्रबाबू नायडूंमध्ये फोनवरुन चर्चा ?

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगू देशमचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत एकत्र येण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वबळाच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली असल्याचं यावरुन दिसत आहे.

दरम्यान मोदी आणि शाहांकडून या दोन्ही पक्षांना गेली काही दिवसांपासून महत्त्व दिलं जात नसल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये संतापाची लाट असल्याचं दिसून येत आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगमोहन रेड्डी यांच्या पक्षासोबत भाजपची वाढती जवळीकता पाहता चंद्रबाबू भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे एनडीएविरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न आता या दोन्ही पक्षाकडून केले जात असून याच सदर्भात उद्धव ठाकरे आणि चंद्रबाबू नायडू यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS