निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोर आलेल्या खा. इम्तियाज जलील यांच्या खांद्यावर चंद्रकांत खैरेंनी ठेवला हात!

निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोर आलेल्या खा. इम्तियाज जलील यांच्या खांद्यावर चंद्रकांत खैरेंनी ठेवला हात!

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी खासदार आणि वंचित बहूजन आघाडीचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील काल समोरा समोर आल्याचं पहावयास मिळाले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्या खांद्यावर चंद्रकांत खैरेंनी हात ठेवत स्मित हास्य केले.१५ ऑगस्टच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्रित आले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून सलग चार वेळा खासदार राहिलेले खैरे यांना मोठा धक्का बसला. वंचित बहूजन आघाडीकडून पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना पराभवाची धूळ चारली. या पराभवामुळे खैरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता पराभवाचं दु:ख विसरत त्यांनी एकप्रकारे जलील यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचं अभिनंदनच केलं असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS