विरोधक साले फालतू फक्त राजकारण करतात, चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली !

विरोधक साले फालतू फक्त राजकारण करतात, चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली !

बीड – औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली आहे. शिवसेनेवर बोलणारे विरोधक फालतू आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी केलेले काम त्यांना दिसत नाही का? विरोधक साले फालतू फक्त राजकारण करतात अशी जोरदार टीका खैरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी जेव्हा मुलींचे लग्न होत नाही असे सांगितले तेव्हा अकराशे मुलींचे कन्यादान बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेतून शिवसेनेने केले. तेव्हा विरोधक काय झोपले होते का? असाव सवालही त्यांनी केला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

दरम्यान खैरे यांनी आज माजलगाव शहरात पिक विमा मदत रथाचे लोकार्पण केले.तेव्हा त्यांनी पिक विम्यासंदर्भात विविध बँकांना भेट दिली. यावेळी त्यांनी बँक कर्मचारी अधिका-यांना सुनावले. शिवसेनेने गेल्या चार वर्षात काहीच केले नाही, या प्रश्नावर उत्तर देताना खैरे यांची जीभ घसरली. विरोधी पक्ष फालतू आहे. हे जे बोलतात शिवसेनेबद्दल ते विरोधी पक्ष फालतू आहेत. चटके बसेपर्यंत आम्ही आंदोलन केले. कर्ज माफी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले.

‘देता की जाता’ हे आंदोलन शिवसेनेने केले. यासाठी 5 लाख लोक आले होते. लोकांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक, अवजारांची आणि धान्याची मदत केली. तसेच शेतकऱ्यांनी जेव्हा मुलींचे लग्न होत नाही असे सांगितले तेव्हा अकराशे मुलींचे कन्यादान बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेतून शिवसेनेने केले. तेव्हा कुठे गेले होते विरोधी पक्ष? असा सवाल खैरे यांनी केला आहे.

COMMENTS