चौथीची पोरगी पण सांगेल यांचं काही खरं नाही, चंद्रकांत पाटलांचा  महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल !

चौथीची पोरगी पण सांगेल यांचं काही खरं नाही, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल !

मुंबई – तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येत असल्याची जोरदार टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर केली आहे.लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपापले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. जेवढं लॉकडाऊनमध्ये कडक नव्हतं त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं आहे. पंढरपूरला गेलो तरी आक्षेप, नाही गेलो तरी आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालत असल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS