…तर आगामी निवडणुकीत कुणाचाही टिकाव लागणार नाही – चंद्रकांत पाटील

…तर आगामी निवडणुकीत कुणाचाही टिकाव लागणार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर –विधान परिषदेच्या शिक्षक पदविधर निवडणुकीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिवसेनेत युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आले की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच या या निवडणुकांमधू स्पष्ट होते असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत विरोधी लढूनही एकूण ७ जागांपैकी भाजप शिवसेनेने ५ जिंकल्या. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही एकमेकांविरोधात लढूनही भाजप शिवसेनेने ४ पैकी ३ जिंकल्या. हे गणित पाहिल्यानंतर युतीसमोर कुणीही शिल्लक राहत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप अजूनही शिवसेनेसोबत उत्सुक असल्याचं दिसत आहे.

COMMENTS