‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक, चंद्रकांत पाटलांचे संकेत?

‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक, चंद्रकांत पाटलांचे संकेत?

पुणे – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातून विधानसभेची निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत थेट निवडणूक कधीच लढविलेली नाही. ते कायम विधान परिषदेच्या माध्यमातूनच आमदार झाले आहेत. परंतु राज्यातलं वातावरण अनुकूल असल्याने दादांनी आता थेट लोकांमधून निवडून येण्याचं ठरवल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट बारामतीत जाऊन शरद पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दिलं गेलं. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात चंद्रकांत पाटील उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS