चंद्रकांत पाटलांची मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी असणाय्रा मनसेच्या उमेदवाराला खुली ऑफर?

चंद्रकांत पाटलांची मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी असणाय्रा मनसेच्या उमेदवाराला खुली ऑफर?

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान पार पडत आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पाटील हे पुण्यातील कोथरुड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आले होते.या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी थेट त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना भाजपची ऑफर दिली असल्याची माहिती आहे. तसेच चंद्रकांत पाटलांनी दिलेली ही ऑफर मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी फेटाळून लावली असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुण्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 28.59 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला असून मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे.

COMMENTS