चंद्रकांत पाटलांविरोधात संतापाची लाट, बेळगाववासीय मराठी तरुण कोल्हापूरकडे रवाना !

चंद्रकांत पाटलांविरोधात संतापाची लाट, बेळगाववासीय मराठी तरुण कोल्हापूरकडे रवाना !

बेळगाव – कर्नाटकचे गोडवे गाणारे महाराष्ट्राचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात सीमा भागात संतापाची लाट उसळत असून जनक्षोभ वाढतच आहे. शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून चंद्रकांत पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी मराठी भाषिक युवकांनी केली आहे. त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बेळगावहून कोल्हापूरला कार्यकर्ते रवाना झाले आहेत. जय भवानी जय शिवाजी, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रॅहेंगे तो जेलमे नही तो महाराष्ट्रमे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मराठी भाषिक युवकांनी चंद्रकांत दादांच्या निषेधाच्या घोषणा देत प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी गोकाक येथील तवग गावात दुर्गादेवी मंदिर उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होऊन कन्नड अस्मितेचं गाणं म्हटलं होतं. त्यामुळे बेळगावातील मराठी माणसाच्या भावनांना ठेच पोहचली होती. या घटनेचे पडसाद बेळगावसह महाराष्ट्रात उमटले होते. राष्ट्रवादीसह सेनेच्या नेत्यांनी दादांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सोमवारी पुन्हा बेळगावातील टिळक चौकात युवकांनी चंद्रकांत पाटलांचा पुतळा जाळून निषेध केला.

 

COMMENTS