चंद्रकांत पाटलांची पत्रकारांना ऑफर !

चंद्रकांत पाटलांची पत्रकारांना ऑफर !

सिंधूदुर्ग  – भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना एक दिवसासाठी भाजपचा नेता होण्याची ऑफर दिली आहे. एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल अशी ऑफर पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानक, खोत, शेट्टी या सगळ्यांचा समतोल करत कसं पुढे जायचं हे लक्षात येईल असंही पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान या सर्वांचा समतोल राखत भाजपनं चार वर्ष पूर्ण केली आहे. तसेच एक वर्षही पूर्ण होईल आणि पुन्हा निवडणूक जिंकू असंही पाटील यांनी म्हटलं आहे. ते सिंधुरग्मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच युतीबाबत साशंक नसून मी नेहमीच युती होईल असं म्हणत आलो असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS