शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा !

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा !

मुंबई – शिवसेना-भाजपच्या युतीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गेली काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात होतं. तसेच याबाबत पंतप्रधान मोदी स्वतः शिवसेनेशी बोलणार असल्याची माहिती होती. परंतु दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. त्यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून नेमकं खरं काय आहे याबाबतचं गुढ वाढलं आहे.

 

COMMENTS