भाजपशिवाय सरकार स्थापन होणार नाही – चंद्रकांत पाटील

भाजपशिवाय सरकार स्थापन होणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपला एकूण संख्याबळ 105 आहे. त्यात 14 अपक्ष सहयोगी त्यामुळे एकूण असे 119 आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

दरम्यान भाजपच्या कालपासून 3 बैठका पार पडल्या आहेत. यामध्ये आमदार, अपक्ष आणि विधानपरिषद अशा विषयांवर चर्चा झाली असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप असून भाजपला विधानसभेत सगळ्यात जास्त म्हणजे 1 कोटी 42 लाख मतं मिळाली असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS