चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं!

चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं!

कोल्हापूर – राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने चंद्रकांत पाटील यांना शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी ए गप्प बस म्हणत त्याला खाली बसवलं.‘तुम्ही तक्रारी करु नका, सूचना करा. तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुरग्रस्ताला झापलं आहे. पुरात बुडालेल्या पुलाची शिरोली या गावात हा प्रकार घडला आहे.याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चंद्रकांत पाटील यांच्या या वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्तांशी संवाद साधत आहेत. शिरोळीमधून रोड सुरु झाला तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपणा सर्वांना प्रार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता…सरकार पूर्णपेणे आपल्या पाठिशी आहे याची खात्री बाळगा. तक्रारी करुन काही होणार नाही. सूचना करा….प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार ? बिचारे चोवीस चोवीस तास झोपलेले नाहीत, याचवेळी लोकांमध्ये बसलेला एक पूरग्रस्त उभा राहून आपली व्यथा मांडू लागला. चंद्रकांत पाटील यावेळी त्याला सगळं करतो सांगतात आणि शेवटी वैतागून ए गप्प म्हणत खाली बसायला सांगतात.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणामुळे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवय्रात अडकणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS